By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 24, 2021 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जागतिक स्तरावरील अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांची केलेली प्रशंसा वादात सापडली आहे. गिता गोपीनाथ इतक्या सुंदर आहेत की त्यांचा संबंध कुणी अर्थशास्त्राशी लावूच शकत नाही, असं म्हणत बच्चन यांनी त्यांची प्रशंसा केली होती. मात्र, त्यांच्या याच प्रशंसेवरुन बच्चन यांच्यावर टीकेची झोड उठलीय. बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या आपल्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. याचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होतोय.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी उपस्थित असलेल्या स्पर्धकाला स्क्रिनवर गिता गोपीनाथ यांचा फोटो दाखवून प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी म्हटलं की त्यांचा चेहरा इतका सुंदर आहेत की त्यांचा संबंध कुणी अर्थशास्त्राशी लावूच शकत नाही. अनेकांनी या वक्तव्याला सेक्सिस्ट म्हटलं आहे. तसेच अमिताभ बच्चन सुंदर स्रिया अर्थतज्ज्ञ होऊच शकत नाही, असं अप्रत्यक्षपणे म्हणत असल्याची टीका केलीय.
Ok, I don't think I will ever get over this. As a HUGE fan of Big B @SrBachchan, the Greatest of All Time, this is special! pic.twitter.com/bXAeijceHE
— Gita Gopinath (@GitaGopinath) January 22, 2021
असं असलं तरी स्वतः गिता गोपीनाथ यांना स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपली प्रशंसा केल्याने आनंद झालाय. त्यांनी आपला तो व्हिडीओ ट्विट करत म्हटलं, “हा क्षण मी कधी विसरु शकेल असं वाटत नाही. या शतकातील महान अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांची मी मोठी चाहती आहे. त्यांनी माझी प्रशंसा करणं खूप मोठी गोष्ट आहे.”
Ok, I don't think I will ever get over this. As a HUGE fan of Big B @SrBachchan, the Greatest of All Time, this is special! pic.twitter.com/bXAeijceHE
— Gita Gopinath (@GitaGopinath) January 22, 2021
गिता यांच्या या आनंदावर अनेकांनी त्यांना सुनावलं आहे. तसेच ही प्रशंसा नसून लिंगभेद करणारं वक्तव्य असल्याचं म्हटलंय. भारतीय महिला अर्थज्ज्ञ रूपा सुब्रमण्य यांनी म्हटलंय, “ही खूपच सेक्सिट आणि मूर्खपणाची शेरेबाजी आहे. तुम्ही यावर आनंद व्यक्त न करता त्याबद्दल नाराजी व्यक्त करायला हवी होती. तुम्ही त्यांच्या या व्हिडीओवर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यावरुन तुम्हाला या सेक्सिझमवर काहीच हरकत दिसत नाही.”
Ok, I don't think I will ever get over this. As a HUGE fan of Big B @SrBachchan, the Greatest of All Time, this is special! pic.twitter.com/bXAeijceHE
— Gita Gopinath (@GitaGopinath) January 22, 2021
रुपा यांच्याशिवाय इतर अनेक महिलांनी बच्चन यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. नमिता गिडवानी यांनी म्हटलं, “मला ब्युटी विथ ब्रेनची प्रतिक्रिया अजिबात आवडलेली नाही. सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया अर्थतज्ज्ञ होऊ शकत नाही हे वक्तव्य मुर्खपणाचं आहे.”
अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) दिग्दर्शित तांडव (Tandav) वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात....
अधिक वाचा