By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 27, 2020 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. आंध्र प्रदेशमधील एक शेतकरी कुटुंब बैल नसल्याने आपल्या मुलींना नांगरला जुंपून शेत नांगरत असल्याचं समोर आलं. यानंतर सोनू सूदने तात्काळ या कुटुंबाला शेती करता यावी म्हणून तातडीने ट्रॅक्टर घरपोच केला आहे. नुकताच सोशल मीडियावर संबंधित मुली नांगराला जुंपून आई-वडिलांसोबत शेतीची मशागत करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोनू सूदने ही स्थिती पाहिल्यानंतर त्याने संबंधित कुटुंबाला तात्काळ ट्रॅक्टर पाठवत असल्याचं कळवलं.
सोनू सूदच्या या मदतीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्या या कामाचं मोठं कौतुक होत आहे. बैल नसल्याने आणि भाड्याने ट्रॅक्टर आणण्याची आर्थिक स्थिती नसलेल्या कुटुंबाला थेट ट्रॅक्टर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या मुली म्हणाल्या, “आम्ही चित्रपटांमध्ये सोनू सूद यांना नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत पाहिलं. मात्र, खऱ्या आयुष्यात ते नायक आहेत. त्यांनी कोरोना साथीच्या काळात अनेक लोकांची मदत केली. त्यांची मदत आमच्यापर्यंत देखील पोहचले असा कधी विचार केला नव्हता. आम्हाला त्यांच्या पाया पडायचं आहे.”
This family doesn’t deserve a pair of ox
मागे
कोरोनाग्रस्त गायिका कनिका कपूरचे नखरे पाहून डॉक्टर कंटाळले
कोरोनाची लागण झालेल्या गायिका कनिका कपूरला लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात आय....
अधिक वाचा