ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Sonu Sood | सोनू सूदला ‘भारतरत्न’ द्या, चाहत्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2020 02:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Sonu Sood | सोनू सूदला ‘भारतरत्न’ द्या, चाहत्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी!

शहर : मुंबई

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या दरम्यान अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) स्थलांतरित कामगारांच्या मदतीला धावून आला होता. त्यानंतर सोनूने मदतीची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकाच्या हाकेला ओ देत, त्यांची मदत केली. सोनू सूदच्या या कामगिरीने त्याने सर्वसामान्यांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. आता सोनू सूदच्या चाहत्याने त्याला ‘भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) देण्यात यावा, अशी मागणी करत थेट पंतप्रधानांना टॅग करत ट्विट केले आहे. (Sonu sood fan appeal to PM modi to honour actor with bharat ratna award)

सोनू सूदच्या या चाहत्याचे नाव आहे सोमनाथ श्रीवास्तव. सोमनाथ यांनी ट्विट करत सोनू सूदचे (Sonu Sood) कौतुक केले आहे. याच ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत त्यांनी लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान, कोरोना काळात सोनू सूदने गरीब मजूर, विद्यार्थी, शिवाय इतर प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत केली आणि करत आहे. तो देशाचा खरा ‘नायक असून, त्याला ‘भारतरत्न पुरस्काराने (Bharat Ratna award) गौरवण्यात यावे, अशी आम्हा सर्व देशवासियांची मागणी आहे.’