By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या या महत्वाच्या व १७५ वर्षे पूर्ण झालेल्या परंपरेचा एक लिखित दस्तऐवज लवकरच रसिकांच्या हातात पडेल. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभागातर्फे पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या संगीत रंगभूमीवर तीन खंडा वर लवकरच काम सुरू होणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली संगीत नाट्य परंपरेचे जतन व संवर्धन होईल व त्याच्या सुवर्ण स्मृतींनाही उजाळा मिळेल. दिलीप बलसेकर, कार्यकारी संपादक व सचिव महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, यांनी असे सांगितले की लवकरच मंत्री, सांस्कृतिक कल्याण, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कामाला गती देण्यात येईल.
“पहिला खंड हा १८४३ ते १८७९ व १८८० ते १९३२ पर्यंतच्या कालखंडावर असेल. यात विष्णुदास भावे, भावे कालीन नाटके, यक्षगान, बुकिष नाटक, फार्स, पारसी, गुजराती, कानडी रंगभूमी, व सोकर बापू त्रिलोकेकर या विषयावर असेल. दुसरा खंड १९३३ ते १९५९ या या कालखंडावर व मामा वरेरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मो गा रांगणेकर यांच्या पर्वावर असेल.
तसेच १९६० ते २०१९ पर्यंतचा कालखंड हा तिसऱ्या खंडात असेल आणि विद्याधर गोखले तसंच साठोत्तर रंगभूमी. वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर या नाटककरांचे योगदान मांडेल. या तिन्ही खंडांमध्ये छायाचित्रं असतील व व या तिसऱ्या खंडा सोबत दृकश्राव्य सीडीचा ही समावेश असेल,” अशी माहिती बलसेकर यांनी दिली.
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची लव्....
अधिक वाचा