ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एनसीबीच्या 'त्या' ५५ प्रश्नांसमोर रिया निरुत्तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एनसीबीच्या 'त्या' ५५ प्रश्नांसमोर रिया निरुत्तर

शहर : मुंबई

अभिनेता सुशात सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडीत ड्रग्ज केसमध्ये रिया चक्रवर्ती सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. सुशांत प्रकरणी आणि ड्रग्जशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आलेज्याची उत्तर दिल्यानंतर रिया चक्रवर्तीवर एनसीबीचा फास आवळला गेला. रिया इच्छा असूनही खोटं बोलू शकली नाही आणि उत्तर देण्याच्या प्रयत्नात फसत गेली. सप्टेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा जेव्हा रियाची चौकशी झाली. तेव्हा हे प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर सप्टेंबरला रियाला अटक झाली.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ५५ प्रश्नांसमोर रिया चक्रवर्ती निरुत्तर झाली. आणि एनसीबीचा फास तिच्या भोवती आवळत गेला. पाहूया रिया या प्रश्नांच्या चक्रव्युहात कशी अडकत गेली. चला घेऊया याचा आढावा.

- तू, तुझे वडील, शौविक आणि सुशांत बड सारख्या ड्रग्जचे सेवन करत होते का?

तुमच्या पवना ट्रीपबद्दल सांग जिथे तू सुशांत बरोबर बऱ्याच वेळा गेली होतीस. तिथं ड्रग्ज सेवनचा घटनाक्रम काय झाला ते सांग ?

- ड्रग्जची खरेदी-विक्री कोण करत होतं? तुला ड्रग्जची व्यवस्था कोण करुन देत होता. याची माहिती दे

- जर तुला माहित होतं सुशांत ड्रग्ज घेत होता तर तू सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था का करत होतीस? ड्रग्ज खरेदीत का सहभागी झालीस ?

- असं खूप वेळा झालंय की ड्रग्ज खरेदी करताना तू कार्डचा वापर केलाय. त्याचं स्पष्टीकरण दे आणि तुझ्या बँक कार्डचं डिटेल्स दे

- शोविकने सांगितल्यानुसार सुशांतला ड्रग्ज उपलब्ध करुन देण्यासाठी तू शोविकला सूचना करत होतीस. हे तू कसं आणि का करत होतीस ?

- तू बड, हॅश, विड याचं सेवन करत होतीस का?

एनसीबीकडून विचारण्यात आलेल्या याच प्रश्नांमध्ये रिया फसत गेल्याचं म्हटलं जात आहे. यातच ड्रग्ज कनेक्शनमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनसीबीने गोव्यातून ७४ वर्षांच्या एका संशयित व्यक्तीलाही अटक केली आहे. जो क्रीस कोस्टाला LSD ड्रग्ज देत होता. या व्यक्तीकडून १६ लाख रुपये जप्त केले आहेत. एनसीबीच्या सुत्रांनुसार उत्तर गोव्यातील अनेक पार्ट्यांमध्ये ही व्यक्ती ड्रग्ज पुरवत होती. त्यानंतर क्रीस कोस्टा हे LSD ड्रग्ज अनुज केसवानीला पुरवत असे.

एनसीबीने या सर्व प्रकरणाची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिली आहे. गेल्या महिन्यात sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात देशातील तीन मोठ्या तपास यंत्रणा तपास करत आहेत. पण, अद्यापही त्याच्या मृत्यूचं कारण अजून जगासमोर आलं नाही. सुत्रांच्या माहितीनुसार सीबीआय ही केस लवकरच बंद करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार १७ सप्टेंबरला होणाऱ्या मेडीकल टीमच्या बैठकी आधीच अंतिम अहवाल देण्यात येणार आहे. यामध्ये सुसाईड थिअरीवरच सगळं लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. तपासातही आत्महत्या केली हेच समोर येत आहे. तेव्हा आता या अंतिम अहवालावरच साऱ्यांचं लक्ष असेल.

 

 

मागे

कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!
कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी रुपयांचा दावा केल....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कंगना म्हणाली, 'तुमचा अपमान करणारे....'
पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कंगना म्हणाली, 'तुमचा अपमान करणारे....'

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ....

Read more