By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ हा चित्रपट 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. ‘एबीसीडी’ सिरीजचा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा हे करत आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असून प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी आहे.
दरम्यान, भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यांच्या लूकवरून या चित्रपटात डान्सची जबरदस्त स्पर्धा रंगणार असल्याचा अंदाज येतो. उद्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मुंबई - १४ वर्षांनंतर बंटी और बबली चाहत्यांच्या भेटीस येणार ....
अधिक वाचा