ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 03:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

शहर : मुंबई

अभिनेता टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित असलेला  स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पाच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाचा ३ मिनिटं ५ सेकंदचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. तर या ट्रेलरमध्ये टीन एजर्सच्या इमोशन, अॅक्शन, रोमांसचा तडका पाहयला मिळत आहे. अनन्या पांडे, तारा सुतारिया पहिल्यांदाच या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तसेच, टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांच्यासह पुनीत मल्होत्राही जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाची कथा टायगर श्रॉफ स्वत:ला सिद्ध करण्याच्या तसंच स्टुडन्ट ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकण्याजवळपास फिरत आहे. या चित्रपटात तारा सुतारिया आणि अनन्या पांडे त्यांच्या लूक्सपासून ते त्यांच्या भूमिकेपर्यंत दोघींनीही एकमेकींना चांगलीच टक्कर दिलीय. तर, चित्रपटात दाखवण्यात आलेलं कॅम्पस शाळा किंवा कॉलेजपेक्षा एखादा स्पोर्ट्स क्लब, डान्स क्लब किंवा फॅशन इंन्स्टिट्यूटसारखा दिसत आहे. परंतु स्टुडन्ट ऑफ द इयर २च्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. 

मागे

अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले गुरुवारी अडकले लग्नबंधनात...
अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले गुरुवारी अडकले लग्नबंधनात...

अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले गुरुवारी लग्नबंधनात अडकले. तर, मोजक्या मि....

अधिक वाचा

पुढे  

निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता प्रियंकाचा खुलासा...
निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता प्रियंकाचा खुलासा...

बॉलिवूड अभिनेञी प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या लग्नानंतर नेहमीच ....

Read more