ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

“तुला पाहते रे” ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

“तुला पाहते रे” ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार

शहर : मुंबई

                'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय.  तुला पाहते रे या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. येत्या जुलै महिन्यात तुला पाहते रे ही मालिका संपणार असून या मालिकेच्या कथानकाला आता काही रंगतदार वळणं मिळणार आहेत. या मालिकेची कथा ही येवढीच असल्याने ती ताणण्यात काहीही अर्थ नसल्याने ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

या मालिकेतील इशा, विक्रम या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. तुला पाहते रे ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला खूपच चांगला टिआरपी आहे. या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे. इशा हीच राजनंदिनी आहे हे विक्रांतला केव्हा कळणार याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या मालिकेच्या शेवटी विक्रांतला त्याने केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल का? इशा विक्रांतने केलेल्या कृत्याचा बदला घेईल का या प्रश्नांची उत्तरे काहीच दिवसांत मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. 

मागे

सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला शाहरुख आणि सलमानने हजेरी
सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला शाहरुख आणि सलमानने हजेरी

कलाविश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामासोबतच एकमेकांसोबत असणाऱं मित्रत्वा....

अधिक वाचा

पुढे  

एका यूट्यूब व्हिडिओेने प्रसिद्धी झोतात
एका यूट्यूब व्हिडिओेने प्रसिद्धी झोतात

नेहाने रिॲलीटी शो 'इंडियन आयडॉल'मधून एक स्पर्धक म्हणून आपल्या करियरची ....

Read more