By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या पतीचा डॅनिअल वेबरचा 41 वा वाढदिवस साजरा केला आहे. सनीने वेबरकरता सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने डेनिअल उत्तम नवरा आणि उत्तम वडील असल्याचं म्हटलं आहे.
आतापर्यंत सनी लिओनीबद्दल खूप वाचलं आहे. पण तिच्या पतीबद्दल खूप कमी माहिती आहे. या दोघांची ओळख कशी झाली? लग्नाचा निर्णय त्यांनी कसा घेतला? सनी आणि डॅनिअल यांची पहिली ओळख लॉस वेगास येथे झाली होती. तेव्हा सनी ऍडल्ट फिल्म इंडस्ट्रीची क्वीन बनली होती. हे दोघं एका कॉमन मित्राच्या पार्टीला गेले होते. डॅनिअल सनीची सुंदरता बघून प्रभावित झाला आणि तेव्हाच त्याने सनीला अप्रोच केलं. पण सनीने त्याला नकार दिला. मात्र तेव्हा त्याने तिचा फोननंबर आणि ईमेल आयडी देखील घेतला होता.
सनीने विरोध करूनही डॅनिअल सतत तिला फूल आणि ईमेल पाठवत असे. या काळात सनीच्या आईचे निधन झाले आणि नुकत्याच झालेल्या ब्रेकअपच्या दुःखात ती होती. या सगळ्यातून तिला बाहेर पडण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर अखेर ती डेनिअलला डेट करू लागली. तिला सुरूवातीला कळत नव्हतं की, डेनिअलला डेट करून ती योग्य करतेय की अयोग्य.
डॅनिअल आणि सनी आपल्या पहिल्या डेटवर पाच तास एकत्र होते. दोघांना खूप गप्पा मारल्या तेव्हा सनी देखील डेनिअलकडे आकर्षित झाली. त्यानंतर डॅनिअलने मोठा बुके पाठवून चिठ्ठी लिहिली त्यावर दोन महिने न भेटल्यामुळे सॉरी देखील म्हटलं आहे. 2011 मध्ये सनीने सिख आणि जेविश पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सनी आणि डॅनिअल यांनी एकत्र येऊन प्रोडक्शन हाऊस सुरू केले. दोघांनी ऍडल्ट सिनेमांसोबत हे दिसले. नंतर सनीने बॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील डॅनिअल तिच्यासोबत होता. डॅनिअल सनीचा पती असून मॅनेजर देखील आहे.
जगातील तंदुरुस्त राहू इच्छिणार्या साठी भारताचा फिटनेस चिन्ह साहिल खान ही स....
अधिक वाचा