ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल

शहर : मुंबई

मुंबईच्या कलिना भागातल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा पुरस्कार जिंकला आहे. 'चिप्पा' या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याने सनी अतिशय खूश आहे. आपल्या यशाचं श्रेय त्याने पालकांना दिलंय. तसंच त्याला रजनीकांतप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं असल्याचंही त्याने म्हटलंय. सनीला बॉलिवुड आणि हॉलिवुडमध्येही काम करायचं असल्याचं त्याने सांगितलंय.

सन्नी कलिना येथील कोचिकोरवेनगर या झोपडपट्टीत राहतो. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६ मधीललायन या हॉलिवूडपटातही काम केलं आहे. सनीची 'लायन' चित्रपटातील 'बेस्ट यंग परफॉर्मर' म्हणून ऑस्करसाठी निवड करण्यात आली होती. 'चिप्पा' या चित्रपटात फुटपाथवर राहणाऱ्या आणि जीवनात मोठी स्वप्न पाहणाऱ्या एका लहान मुलाच्या महत्वाकांशेविषयी दाखवण्यात आलं आहे.

मागे

Avengers सीरीजमधील अभिनेत्याची आत्महत्या, शेअर केली भावनिक पोस्ट
Avengers सीरीजमधील अभिनेत्याची आत्महत्या, शेअर केली भावनिक पोस्ट

हॉलिवुड अभिनेता इसाक कॅपी याने (Isaac Kappy) आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी सम....

अधिक वाचा

पुढे  

“गेम ऑफ थ्रोन्स”ने घेतला प्रेक्षकांचा निरोप
“गेम ऑफ थ्रोन्स”ने घेतला प्रेक्षकांचा निरोप

मनोरंजन विश्वात सध्याच्या घडीला एकंदर हवा पाहता गेम ऑफ थ्रोन्स या काल्पनिक....

Read more