By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
11 वर्षीय सनी पवार पुन्हा एकदा परदेशात डंका पिटला. सनीने 19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा अॅवॉर्ड जिंकला आहे. चिप्पा सिनेमातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. सनीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या 2016मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटात देव पटेलच्या लहानपणीची भूमिका साकारली आहे. हा अॅवॉर्ड जिंकल्यानंतर सनी म्हणाला, चिप्पा ही एका मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे, ज्याला त्याच्या दहाव्या वाढदिवसाला दीर्घकाळापासून दूर असलेल्या त्याच्या वडिलांचे पत्र मिळते. तो आपले रस्त्यावरील घर सोडून काही आणखी गोष्टींचा शोध घेण्याचे ठरवतो. चित्रपट एका रात्रीमध्ये घडलेल्या घटनांना सादर करतो. यामध्ये चिप्पाने त्याच्या वडिलांशी असलेल्या बंधांचा शोध घेण्यासाठी केलेल्या सुंदर व घटनापूर्ण प्रवासाचा समावेश आहे. सनीसोबत चंदन रॉय सन्याल, मसूद अख्तर, सुमीत ठाकूर आणि माला मुखर्जी यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
”मला हा पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. याचे सारे श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते. मला रजनीकांत यांच्यासारखा मोठा कलाकार व्हायचं आहे तसेच आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी मला करायची आहे. मला बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीकडे काम करायची इच्छा आहे.”
सनी पवार, बाल कलाकार
गेल्या 36 वर्षांपासून विविध चित्रपट पडद्यावर दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन क....
अधिक वाचा