ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Sushant Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Sushant Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल (report) सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. एम्सच्या या अहवालावर आता सुशांतचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

एम्सच्या अहवालानंतर त्यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी विकास सिंह (Vikas Singh) यांनी ट्विट केले की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे (AIIMS report) मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्टम अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’

नवीन फॉरेन्सिक पथक नेमण्यात यावे

यापूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना वकील विकास सिंह (Vikas Singh) म्हणाले की, एम्सच्या टीमने सुशांतच्या मृतदेहाची प्रत्यक्षात तपासणी केलेली नव्हती आणि त्यांचा अहवाल केवळ छायाचित्रांवर अवलंबून असल्याने, हा अहवाल निर्णायक मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या पथकाची नेमणूक करून या प्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘एम्सचा अहवाल निर्णायक नाही आणि तरीही सीबीआय आरोपपत्रात सुशांत सिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण हत्येचा गुन्हा म्हणून दाखल करू शकते.’

सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.

मागे

Drugs Case : 'कलाकारांची नावे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे.
Drugs Case : 'कलाकारांची नावे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे.

अभिनेता सुशांतसिंह आत्यहत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) प्रक....

अधिक वाचा

पुढे  

कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी
कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राज्याच....

Read more