ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

शहर : देश

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सुनावणी पूर्ण झाली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश राखून ठेवला. न्यायालयाने सर्व पक्षांच्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद संक्षिप्त स्वरुपात लेखी देण्याच्या सूचना केल्या आहेत.

केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी म्हटलं की, सीआरपीसी CrPC 174 अंतर्गत सुरू झालेल्या घटनेच्या मृत्यूची चौकशी फारच थोड्या काळासाठी सुरु राहते. मृतदेहाकडे पाहून आणि घटनास्थळी जाऊन मृत्यूचे कारण संशयास्पद आहे की नाही हे पाहिलं जातं. मग FIR नोंदवला जातो. मुंबई पोलिस जे करत आहेत ते योग्य नाही.

यापूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले की सुशांतला कुटुंबापासून दूर केलं जात होतं. सुशांतच्या वडिलांनी वारंवार विचारले होते की सुशांतवर काय उपचार सुरु आहेत. मला तिथे येऊ द्या. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात अनेक बाबी तपासण्यायोग्य आहेत. असे दिसते आहे की गळ्यातील खुणा बेल्टच्या होत्या. पंखावरून लटकलेला मृतदेह कोणाला दिसला नाही.ते म्हणाले, “मीडिया रिपोर्टच्या आधारे समोरिल बाजूकडून युक्तिवाद सुरु आहे. मात्र आम्ही तस होऊ देणार नाहीत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मुलगाही सहभागी असल्याचे मीडिया सांगत आहे. पण यावर मला काही सांगायचे नाही.

 

मागे

Rahat Indori passes away | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचं निधन
Rahat Indori passes away | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचं निधन

लोकप्रिय गझलकार, शायर राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. राहत इंदौरी यांना कोर....

अधिक वाचा

पुढे  

Mayuri Deshmukh |
Mayuri Deshmukh | "आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस..." मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

अभिनेता आशुतोष भाकरे याच्या अकाली निधनानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री मय....

Read more