ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुशांतसिंह राजपूतच्या मित्राचा खुलासा, सांगितले 'रिया चक्रवर्तीचे शिवसेना कनेक्शन!'

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2020 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुशांतसिंह राजपूतच्या मित्राचा खुलासा, सांगितले 'रिया चक्रवर्तीचे शिवसेना कनेक्शन!'

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत  याच्या मृत्यूच्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतसिंहचा जवळचा मित्र सुनील शुक्ला  याने गंभीर आरोप केला आहे. रिया चक्रवर्ती   हिचे शिवसेना पक्षाशी कनेक्शन आहे. या कनेक्शनची चौकशी करण्याची त्याने मागणी केली आहे.

सुनील शुक्ला याच्या आरोपानुसार रिया चक्रवर्ती हिला महाराष्ट्रातल लोणावळ्यातील पवना तलावाजवळ जमीन खरेदी करायची होती. राज्याच्या वन विभागाची ही जमीन खरेदी करण्यासाठी रिया हिने कथितपणे वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेत चर्चा केली होती. परंतु लॉकडाऊन असल्याने याबाबतचा व्यवहार झाला नाही.

सुनील शुक्ला याने सीबीआयला याची चौकशी करुन सत्य समोर आणण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या आरोपांमध्ये थोडेजरी सत्य असल्यास, आगामी काळात रियाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

सुशांत 'हँग-आउट-व्हिला' मध्ये पार्टी करायचा

विशेष म्हणजे पवना भागात सुशांतसिंह राजपूत याने 'हँग-आऊट व्हिला' नावाचे फार्म हाऊस भाड्याने घेतले आणि तिथे सुट्टीला जायचा. नुकतीच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सुशांतच्या काही नोट्स आणि इतर वस्तू या फॉर्म हाऊसमधून जप्त केल्या आहेत. इतकेच नाही तर या फॉर्म हाऊसचे केअर टेकर आणि येथील बोटमन यांनी एनसीबीला दिलेल्या निवेदनात सांगितले की, सुशांतने रिया चक्रवर्ती, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत या फार्म हाऊसवर वेगवेगळ्या वेळी पाटर्या केल्या आहेत.

कोणालाही एनसीबीची क्लीन चिट नाही

या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील कोण कोण होते, ते ड्रग्जचे सेवन करत होते की नाही याची चौकशी एनसीबी (NCB) करत आहे. यासंदर्भात एनसीबीने आतापर्यंत दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीने आतापर्यंत कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. आतापर्यंत चौकशीत बॉलिवूडमधील काही बड्या कलाकारांची नावेही समोर आली आहेत. या सर्वांना एनसीबी लवकरच चौकशीसाठी बोलवू शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

     

मागे

चित्रिकरण बंद करणारे हे कोण? चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा सवाल
चित्रिकरण बंद करणारे हे कोण? चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा सवाल

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हा ट्रस्ट आहे. ही कोणतीही संघटना नाही. अशावेळी च....

अधिक वाचा

पुढे  

करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर
करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर

अभिनेता सुशांत सिंह राजपूच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाल....

Read more