By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले गुरुवारी लग्नबंधनात अडकले. तर, मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नेरळ येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडलाय. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. तर,काही महिन्यांपूर्वीचं सुव्रत-सखीचा साखरपुडा झाला. या विवाहसोहळ्यात सखीने हिरव्या रंगाची पैठणी, नथ, कोल्हापुरी साज, पाटल्या असा अस्सल मराठमोळा पेहराव केला होता. तर सुव्रतनं कुरता, शाल आणि टोपी असा पेहराव केलेला. या सोहळ्याला अभिनेता जितेंद्र जोशी, चिन्मयी सुमित, सुमित राघवन, अमर फोटो स्टुडिओची सगळी टीम, आरती वडगबाळकर, रेशम प्रशांत, सायली संजीव, पर्ण पेठे, अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी आणि सुनील बर्वे यांनी हजेरी लावली होती.
आता मराठी प्रेक्षकांच्या भेटीला ६६ सदाशिव नावाचा सिनेमा लवकरचं भेटीला येण....
अधिक वाचा