By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 19, 2019 02:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बहुचर्चित सिनेमा तान्हाजी द अनसंग वॉरियरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवगण तान्हाजी मालुसरेंची,शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर काजोल सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. विशेष म्हणजे तान्हाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे युद्धप्रसंगांदरम्यानची थरारक अनुभव खास असतील.
17 व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकताना तान्हाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात येतोय. ट्रेलरमध्ये अनेक दमदार डायलॉग असून ऍक्शन सीन्स पाहून शहारे आणतात.
काजोल-अजय आणि अजय - सैफ जोडी पुन्हा एकत्र काम करताना यात पाहायला मिळणार. सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं 10 जानेवारी 2020 दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आल्....
अधिक वाचा