By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 03, 2020 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नेहमी वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. जुन्या आठवणी ताज्या करत तिला स्वप्ननगरी मुंबईची आठवण आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मुंबईत सकाळी घोडेस्वारीच्या आठवणींना तिने उजाळा दिला आहे. शिवाय घोडेस्वारी करतानाचे काही फोटो देखील तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
One thing I miss the most about Mumbai is horse back riding every other morning in race course, I have never been a sports person but I find meditative partnership with my horse, being one with another being is such as exhilarating experience #MondayMotivation pic.twitter.com/nawGCHoSgO
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 2, 2020
फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये मुंबईची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. 'मला मुंबईमधील एका गोष्टी आठवण सतत सतावात आहे. ती म्हणजे घोडेस्वारी..प्रत्येक सकाळी घोडस्वारी करण्याची मज्जा वेगळीच आहे. मला खेळामधील फार ज्ञान नाही. पण माझा घोडा माझी नेहमी साथ देतो.' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सांगायचं झालं तर, कंगना सध्या तिचा आगामी चित्रपट 'तेजस'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने चित्रपटाचे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय सध्या तिच्या आडचणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
फरीदाबादमध्ये निकिता हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरुन ठेवलं आहे. २६ ऑक्टोब....
अधिक वाचा