By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'झुंड' या चित्रपटाचा फर्स्ट लूक म्हणजेच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अतिशय दमदार अशा या चित्रपटचे पहिले पोस्टर कलाविश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहे. नागराज पोपटराव मंजुळे असं नाव चित्रपटाच्या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. ज्यावर मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे ही दोन तगडी नावं या चित्रपटाशी जोडली गेल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार बिग बी हे एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला 'झुंड' मध्ये विजय बारसे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यांनी 'स्लम सॉकर'ची सुरुवात केली होती.
T 3415 - JHUND ... झुंड !! ... JHUND ... झुंड !!#Jhund@Nagrajmanjule
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 20, 2020
@itsBhushanKumar
#KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath #GargeeKulkarni #MeenuAroraa @AjayAtulOnline
@tandavfilms
@aatpaat
@TSeries pic.twitter.com/4iTXi6mkc1
अमिताभ बच्चन या चित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्यांनी रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ओढ निर्माण केली. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे पहिल्यांदाच कलाविश्वातील महानायकासोबत काम करीत आहे. हा चित्रपट आणखी एका कारणामुळेही महत्त्वाचा आहे, ते कारण म्हणजे 'झुंड'च्या निमित्ताने नागराज मंजुळे हिंदी कलाविश्वातही पदार्पण करीत आहे.
मुंबई - इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' चित्रपटचा ट्रेलर न....
अधिक वाचा