By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 01:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता अभिषेक बच्चन सध्या बर्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. तापसी पन्नू आणि विकी कौशलच्या मनमर्झिया या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. आता त्याने पुन्हा एकदा जोरदार एंट्री केली आहे. त्याच्या आगामी चित्रपट तो शेअर मार्केट घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहता याची भूमिका साकारणार आहे अशी चर्चा आहे. तसेच या चित्रपटाचं नाव देखील ‘द बिग बुल’ असं आहे.
दरम्यान, १९८०- ९० च्या दशकात शेअर मार्केटचा बिग बुल या नावाने हर्षद मेहता याला ओळखलं जात होतं. शेअर मार्केटचं रुपडं बदलणार्या मेहताचा पर्दाफाश झाला आणि कोट्यवधीचा घोळाला केल्याचे उघड झाले होते. याचं मेहताच्या आयुष्यावर ही कथा बेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
The Big Bull! The man who sold dreams to India. @ajaydevgn @Ileana_Official @s0humshah @nikifyinglife @anandpandit63 @kookievgulati @KumarMangat @ADFFilms #TheBigBull pic.twitter.com/6uvdnfiGUF
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) January 2, 2020
निर्मात्याकडून तसे सांगण्यात आले नसले तरी अभिषेकच्या मिशीची दमदार छबी सर्व काही सांगून जाते. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करणार असून कुकी गुलाटी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्च्नसोबत अभिनेत्री इलीयाना डिक्रुजही झळकणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.
भय बर्याच वेळा प्रसंगानुरूप असते, त्यामुळे ते कोणत्या गो....
अधिक वाचा