ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमिषा पटेल मोठ्या अडचणीत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 30, 2019 12:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमिषा पटेल मोठ्या अडचणीत

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ही अभिनेत्री सध्याच्या घडीला अडचणीत अडकलेली आहे. चित्रपट निर्माते अजय सिंह यांनी तिच्यावर . कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप केला आहे. ज्या धर्तीवर त्यांनी अमिषाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

रांची न्यायालयात त्यांनी याप्रकरणी धाव घेतली आहे. आयएएनएसशी संवाद साधतेवेळी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. तीन कोटी रुपयांचा धनादेश बाऊंस झाल्यानंतर आपण हे पाऊल उचलल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील वर्षी 'देसी मॅजिक' नामक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अमिषाने त्यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. पण, आता मात्र ती या पैशांचा विषयच काढत नव्हती. या संपूर्ण आर्थिक व्यवहाराप्रकरणी अमिषाला न्यायालय़ाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत तिने जुलै या तारखेपूर्वी न्यायालयापुढे हजर राहणं अपेक्षित आहे. अमिषा न्यायालयात हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात येईल अशी माहितीही सिंह यांनी दिली.

२०१७ मध्ये सदर निर्माते आणि अमिषाची भेट झाली होती. त्याचवेळी त्यांच्यामध्ये एका चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटाचं त्यावेळी चित्रीकरण सुरूच होतं. काही भागाचं चित्रीकरण पूर्ण होतं, तर काही भाग आर्थिक अडचणींमुळे रेंगाळला होता. ज्यामुळेच सिंह यांनी चित्रपटात . कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

 

 

 

मागे

'दंगल'फेम झायरा वसिमचा बॉलिवूडला रामराम
'दंगल'फेम झायरा वसिमचा बॉलिवूडला रामराम

'दंगल' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री झायरा वसिम हिने एकाए....

अधिक वाचा

पुढे  

नंदिश सिंह संधुची बॉलीवुडमध्ये पदार्पण
नंदिश सिंह संधुची बॉलीवुडमध्ये पदार्पण

टी.व्ही. अभिनेता नंदिश सिंह संधु 'सुपर 30' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदा....

Read more