By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई - सलमान खानचा बहुप्रतीक्षीत 'दबंग ३' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २४ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. अशा परिस्थितीत पहिल्याच दिवशी २४ कोटींची कमाई करणे यातच 'दबंग ३'चे यश आहे, असे मानले जात आहे.
बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम यांनी हा चित्रपट पहिल्या दिवशी २२ ते २४ कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली होती. एका अन्य अहवालानुसार, देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे या चित्रपटाला १५ ते २० टक्क्यांचे नुकसान झाले आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा चित्रपट २५ कोटींचा आकडा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, तो पल्ला हा चित्रपट गाठू शकला नाही. काही ठिकाणी चित्रपटगृहे लवकर बंद करण्यात आली. चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे नसल्याचे काही अहवालातून सांगण्यात आले आहे.
'दबंग ३' चित्रपट तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांतूनही प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, यातून चित्रपटाला फारशी चांगली कमाई झालेली नाही. अन्य भाषा आणि मुख्य हिंदी भाषेतील मिळून या चित्रपटाची एकूण कमाई २५ कोटींचा आकडा पार करू शकलेली नाही.
मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आं....
अधिक वाचा