ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठी चित्रपटाचा परदेशात डंका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठी चित्रपटाचा परदेशात डंका

शहर : मुंबई

'भावनेला भाषा नसते' अशा टॅगलाइन खाली साकारण्यात आलेल्या 'बाबा' या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन 'गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस'च्या 'हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स'साठी (एचएफपीए) झाली आहे. चित्रपटाचे निर्माते 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'च्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांनी याबाबत माहिती दिली. ऐकू आणि बोलू शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक कहाणी साकारण्यात आली आहे. वडील मुलाच्या सुंदर नात्याभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची निर्मिती असलेल्या 'बाबा' चित्रपटाची मोठी चर्चा होती. प्रदर्शनानंतर चित्रपटाला मोठा प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स यांच्याबरोबर 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे.

'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'कडून लवकरच नव्या चित्रपटाची घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे. जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या 'गोल्डन ग्लोब्ज'च्या नामांकनांच्या यादीत चित्रपट प्रवेश करेल, अशी आमची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांनी व्यक्त केला आहे.

 

 

मागे

सैफच्या 'नागा' आणि रणवीरच्या 'खिलजी' चेहऱ्यामागे 'या' व्यक्तीचा हात
सैफच्या 'नागा' आणि रणवीरच्या 'खिलजी' चेहऱ्यामागे 'या' व्यक्तीचा हात

एका नागा साधूचा लूक हा कायमच वेगळा असतो. 'लाल कप्तान' सिनेमातील सैफ अली खा....

अधिक वाचा

पुढे  

साहिल खान फिटनेस आणि ब्युटी रिसॉर्ट चा भूमीपूजन समारोप
साहिल खान फिटनेस आणि ब्युटी रिसॉर्ट चा भूमीपूजन समारोप

जगातील तंदुरुस्त राहू इच्छिणार्या साठी भारताचा फिटनेस चिन्ह साहिल खान ही स....

Read more