By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 07:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली- विज्ञान भवनात आज सोमवारी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते ६६ वा राष्ट्रीय पुरस्कार २०१९ विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आयुष्मान खुरानाला 'अंधाधूंद' आणि विक्की कौशलला 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक'साठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार आहे.
याशिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला 'महानती' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सुरेखा सीकरी यांना 'बधाई हो' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणारआहे. याशिवायही सिनेसृष्टीतील इतर कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ३१ आणि नॉन फिचर फिल्मच्या यादीत २३ पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी भारतातील वेगवेगळ्या भाषांमधील सर्वोत्तम सिनेमांसाठी तसेच परफॉर्मन्ससाठी पुरस्कार दिले जातात. यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, दिग्दर्शन, प्रोडक्शन, सामाजिक संदेश, गायक, गीत आणि गीतकार अशी वेगवेगळी नामांकनं आहेत.
‘धुरळा’ हा मल्टीस्टारर मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्य....
अधिक वाचा