By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'द टर्निंग' या चित्रपटाचे दिग्दर्शक फ्लोरिया सिगिसमोंडी आहेत. फ्लोरिया यांनी आपल्या या चित्रपटात रहस्यमयी गोष्टी दाखल्या आहेत. 'द टर्निंग' हा चित्रपट युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे प्रदर्शित होणार आहे.
हेन्री जेम्स यांनी लिहिलेल्या १८९८ च्या भूत कथेत 'द टर्न ऑफ स्क्रू' चे आधुनिक रूपांतर केल्याचे दर्शविले आहे. यामध्ये मॅकेन्झी डेव्हिस, फिन वुल्फार्ड, ब्रूकलिन प्रिन्स आणि जॉली रिचर्डसन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
फ्लोरा आणि माईल्स या अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी केटची नियुक्ती केली जाते. केट या विचित्र घरात राहायला येते. काही दिवसांनी या घरात तिला रहस्य असलेल्या गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्या अनाथ असलेल्या दोन लहान मुलेही वेगळी असल्याचे तिला लक्षात आल्यावर यातून रहस्याचा उलखडा होतो. अशा या चित्रपटाचा रहस्य जाणण्यासाठी २४ जानेवारी २०२० ला जवळच्या सिनेमाघरात पाहायला मिळणार आहे.
मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'झुंड'....
अधिक वाचा