ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या जानेवारीमध्ये; ‘राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही यंदाच्या म

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या जानेवारीमध्ये; ‘राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही यंदाच्या म

शहर : पुणे

पुणे- चित्रपट रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) ९ ते १६ जानेवारीदरम्यान पुण्यात रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष ही यंदाच्या पिफची मध्यवर्ती संकल्पना (थीम) असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी येथे दिली.

पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे व अभिजित रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते. 


पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महोत्सवात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पिफचा उद्घाटन आणि समारोप सोहळा यंदा एफटीआयआय प्रांगणात रंगणार आहे, असेही ते म्हणाले.
 

मागे

'वंडर वुमन १९८४' चा पावरफुल ट्रेलर प्रदर्शित, एकदा बघाच...
'वंडर वुमन १९८४' चा पावरफुल ट्रेलर प्रदर्शित, एकदा बघाच...

अनेक चाहते 'वंडर वुमन १९८४' या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत ....

अधिक वाचा

पुढे  

२ मिनिटे १९ सेकंदाची झलक पाहून संपूर्ण देश भावूक; दीपिकालाही रडू आवरेना...
२ मिनिटे १९ सेकंदाची झलक पाहून संपूर्ण देश भावूक; दीपिकालाही रडू आवरेना...

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ....

Read more