By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
१९९० च्या दशकात कश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारानंतर लाखो पंडितांना त्यांचे हक्काचे घर सोडावे लागले होते. त्यांच्या वेदना, यातना आणि संहार दाखवणारा 'शिकारा - द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडित' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित असलेल्या विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. १९ जानेवारी १९९० साली लाखो कश्मीरी पंडितांना जन्मभूमीवर अत्याचारकरून पळवून लावले होते.
३० वर्षापूर्वी झालेल्या पंडितांवर अत्याचार का करण्यात आले? कशा प्रकारे छळ करण्यात आले? ते या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून सत्याचे पडसाद उमटताना दिसणार आहे.
'शिकारा - द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडित' या चित्रपटात आदिल खान आणि सादिया ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणारा आहे. आदिलचे यात शिवकुमार धर आणि सादिया शांती धर यांची भूमिका साकारली आहे.
दिग्दर्शकांनीच या चित्रपटाच्या भूमिकेत पुन्हा एंट्री केली असून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या दृष्टीने किती चांगला ठरेल हे पहाणे महत्वाचे ठरेल. दरम्यान हा चित्रपट येत्या १९ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
मुंबई - दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री अ....
अधिक वाचा