ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नरेंद्र मोदी यांच्यावर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नरेंद्र मोदी यांच्यावर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून 'पीएम मोदी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक विरोधी पक्षांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विरोध होत होता. पण आता या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. निर्माता संदीप सिंगने शुक्रवारी ट्विटरच्या मध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'पीएम नरेंद्रे मोदी' चित्रपट ११ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.  आचारसंहिता सुरू असताना चित्रपट प्रदर्शित करू न देण्याची मागणी करण्यात आली होती. 
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भूमिका साकारताना दिसणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे चित्रपटावर अनेक टीका ही करण्यात येत होत्या.  
सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार रूपेरी पद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांनी केले आहे. 

मागे

कंगणाने एका सिनेमासाठी घेतले २४ कोटी रुपयांचे मानधन
कंगणाने एका सिनेमासाठी घेतले २४ कोटी रुपयांचे मानधन

कंगणा राणावत झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सिनेमातून चांगलीच चर्चेत आली. आत....

अधिक वाचा

पुढे  

भाभीजी म्हणते...मी पण चौकीदार
भाभीजी म्हणते...मी पण चौकीदार

टेलिव्हिजनवरील 'भाभीजी घर पर है' मालिकेतून घरांघरात पोहचलेली अंगूरी भाभ....

Read more