ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राखीचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक… काय घडलं कोर्टात?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 13, 2024 07:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राखीचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक… काय घडलं कोर्टात?

शहर : मुंबई

राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. राखी सावंत हिने तिचा पती आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. फक्त राखी सावंतच नाही तर आदिला दुर्रानी यानेही त्याच्यावर आरोप केले.

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने पती आदिल दुर्रानी खान याच्यावर गंभीर आरोप केले. काही दिवस राखी सावंत हिने आपल्या लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. त्यानंतर तिने थेट लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. आता राखी सावंत हिचे वैवाहिक आयुष्य तूफान चर्चेत आलंय. राखी सावंत आणि तिचा पती दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. हेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहचला आहे.

आदिल दुर्राणी याने राखी सावंत हिच्यावर आपले खाजगी व्हिडीओ लीक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. आता नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राखी सावंत हिच्यावर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसोबतच मानहानीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट 2023 रोजी दोन व्हिडीओ हे दाखवले गेले. राखीच्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे की, तिच्या पतीवर छळाचा आरोप आहे. कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यांनी तपासात संपूर्ण सहकार्य केले. आदिलच्या रिपोर्टनुसार, राखीने मुद्दाम तो व्हिडिओ एका टीव्ही शोमध्ये दाखवला ज्यामध्ये दोघांचे इंटिमेट सीन होते.

तो प्रत्येक व्हिडिओ 25 ते 30 मिनिटांचा होता. राखी सावंतच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओनंतर आदिलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुळात म्हणजे हा व्हिडीओ आदिल दुर्रानी यानेच रेकाॅर्ड केला आहे. त्यामुळे कलम 67A नुसार तो देखील गुन्हेगार आहे. असेही सांगितले जातंय. की, प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये काही दिसत नाहीये.

कायद्याचे उल्लंघन झाले असे म्हणता येणार नाही. आता राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद हा वाढताना दिसतोय. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच खुलासा करत थेट म्हटले की, आदिल दुर्रानी खान याने फक्त आणि फक्त बिग बाॅसच्या घरात सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत लग्न केले. राखीचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.

काही दिवसांपूर्वीच आदिल दुर्रानी खान याला घटस्फोट देणार नसल्याचे राखी सावंत हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले. राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी खान याला काहीही झाले तरीही मी घटस्फोट देणार नाहीये. कारण तो माझ्याप्रमाणे अजून काही मुलींचे आयुष्य खराब करू शकतो, यामुळेच काहीही झाले तरीही मी आदिल दुर्रानी खान याला घटस्फोट देणार नाहीये.

पुढे  

करण जोहर याचं सेक्शुएलिटीवर मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आयुष्यातील इतकं मोठं सत्य…’
करण जोहर याचं सेक्शुएलिटीवर मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आयुष्यातील इतकं मोठं सत्य…’

'आयुष्यातील इतकं मोठं सत्य...', करण जोहर याचं स्वतःच्या सेक्शुएलिटीवर लक्ष....

Read more