ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'या' चित्रपटाने मोडला बाहुबल्लीचा विक्रम

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'या' चित्रपटाने मोडला बाहुबल्लीचा विक्रम

शहर : मुंबई

अलीकडच्‍या काळात दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्‍ये डब करून दाखवले जातात. प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहून दाक्षिणात्‍य निर्माते- दिग्दर्शकही अशा प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठ्‍या पडद्‍यावर दाखवतात. ॲक्‍शनने भरपूर असा बाहुबली सर्वांनाच पहिलं आहे आणि बाहुबलीने विक्रमी कमाई पण केली. बाहुबलीच्या मागोमाग आता अजून एक मल्‍याळम चित्रपटाच नाव येत आहे. 
एका आठवड्‍यापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा गल्‍ला वाढत चालला आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीतला  सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ल्यूसिफर' या चित्रपटाविषयी. एका आठवड्‍यात या  चित्रपटाने १०० कोटींच्‍या क्‍लबमध्‍ये सामील झाला आहे. याची माहिती स्‍वत: मोहनलाल यांनीच त्यांच्या ट्‍विटर अकाऊंटवरून दिली आहे. 
मोहनलाल यांनी ट्‍विटमध्‍ये लिहिले आहे-'केवळ ८ दिवसांमध्ये ल्यूसिफरने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. हे खरंच अद्वितीय आहे. तुमच्याच पाठिंब्यामुळे आज मल्याळम चित्रपटसृष्टी काही नवी क्षितीजे पादाक्रांत करत आहे', असे ट्विटमध्ये लिहित मोहनलाल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. 
मोहनलाल यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे
आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत अभिनेता मोहनलाल यांनी ३००हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, त्यांनी हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू या चित्रपटांमध्येही काम केले आहे. मोहनलाल यांना  पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
२०१६ हे वर्ष मोहनलाल यांच्या कारकिर्दीसाठी फारच चांगले गेले. ‘पुलीमुर्गन’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सर्वाधिक जास्त कमाई करण्याचा रेकॉर्डही या चित्रपटाने केला आहे. ‘पुलीमुर्गन’ चित्रपटाने जागतिक स्तरावर १३० कोटींची कमाई केली होती.

मागे

दबंग 3 चे चित्रीकरण रद्द करण्याची पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 
दबंग 3 चे चित्रीकरण रद्द करण्याची पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’ च्या फ्रेन्जायझीमधील तिस....

अधिक वाचा

पुढे  

६६ सदाशिव हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...
६६ सदाशिव हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...

आता मराठी प्रेक्षकांच्या भेटीला ६६ सदाशिव नावाचा सिनेमा लवकरचं भेटीला येण....

Read more