By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 04:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या कानाला खडा या चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसेच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. या कार्यक्रमातील शुक्रवारच्या भागात अभिनेता संजय नार्वेकरने हजेरी लावली होती. माञ, यावेळी त्याने एक मोठा खुलासा केलाय.
मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील सर्कीटच्या भूमिकेची ऑफर संजय नार्वेकरला मिळाली होती. पण तारखा जुळत नसल्याने त्याने ती नाकारली. याबद्दल त्याने सांगितलं, जेव्हा ती भूमिका हातातून गेली आणि नंतर संजय दत्त मला भेटला तेव्हा तो म्हणाला, तू मला का नाही बोललास? तुझ्यासाठी मी माझ्या तारखा पुढे ढकलल्या असता. माझं वेळापत्रक बदललं असतं. पण जसं वास्तव चित्रपटातील देड फुट्या ही भूमिका माझ्या नशिबात होती, तशी सर्कीटची भूमिका अर्शदच्या नशिबात होती. सर्कीटची भूमिका नाकारल्याने मला अगं बाई अरेच्चा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि हा चित्रपटसुद्धा खूप गाजला होता.
सोनी कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर, ....
अधिक वाचा