ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विराट-अनुष्काच्या लग्न वाढदिवसाचा हा फोटो सगळ्यात वायरल...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 05:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विराट-अनुष्काच्या लग्न वाढदिवसाचा हा फोटो सगळ्यात वायरल...

शहर : देश

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने इटलीतील टस्कनी येथे ११ डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. अगदी नेमक्याच नातेवाईकांच्या हजेरीत हा लग्नसोहळा पार पडला. 


विराटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटीक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत “केवळ प्रेम हे खरं असतं, इतर काहीही सत्य नसतं. त्यातच जेव्हा देवाच्या कृपेने प्रेम करणारा साथीदार आपल्याला लाभतो तेव्हा देवाचे आपण खुपच ऋणी असल्यासारखे वाटते” असे कॅप्शन दिले आहे. विराट-अनुष्काच्या लग्न वाढदिवसाचा हा फोटो सगळ्यात वायरल झाल्याचे दिसून आले.


दरम्यान, विराट आणि अनुष्का यांचे बोर्गो फिनोकिएटो ( Borgo Finocchieto) नावाच्या रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळ पार पडला. हा जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा महागडा रिसॉर्ट आहे. फ्लोरेन्स विमानतळपासून तासाभराच्या अंतरावर टस्कनीतील निसर्गरम्य ठिकाणी बोर्गो रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये प्रती व्यक्ती खर्च तब्बल १ कोटी रुपये आहे. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचा एकूण खर्च १०० कोटी रुपये झाला असल्याचे म्हटले जात आहे. 
 

मागे

'याद पिया की आने लगी' नेहा कक्करच्या गाण्याची टी-सिरिजवर धूम
'याद पिया की आने लगी' नेहा कक्करच्या गाण्याची टी-सिरिजवर धूम

मुंबई - बॉलिवूडची रिमिक्स क्विन बनलेल्या गायक नेहा कक्करचं 'याद पिया की आन....

अधिक वाचा

पुढे  

... तीन मुलांची आई असलेली ही अभिनेत्री ठरली गुगलवरची हाय ट्रेंडिंग सर्च...पाहा तुम्हीच
... तीन मुलांची आई असलेली ही अभिनेत्री ठरली गुगलवरची हाय ट्रेंडिंग सर्च...पाहा तुम्हीच

आता प्रत्येक व्यक्ती ‘गुगल सर्च’कडेच धाव घेत आहे. मनोरंजनपासून अगदी विज....

Read more