ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Avengers सीरीजमधील अभिनेत्याची आत्महत्या, शेअर केली भावनिक पोस्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Avengers सीरीजमधील अभिनेत्याची आत्महत्या, शेअर केली भावनिक पोस्ट

शहर : देश

हॉलिवुड अभिनेता इसाक कॅपी याने (Isaac Kappy) आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इसाकने मार्वल स्टूडियोजच्या २०११ मध्ये आलेल्या 'थॉर' चित्रपटात अभिनय केला आहे. एरिजोनातील सार्वजनिक सुरक्षा विभागाने त्याच्या निधनाची माहिती दिली. तो ४२ वर्षांचा होता. 'यूएसए टूडे'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, इसाक कॅपीने एरिजोनातील फ्लॅगस्टाफजवळ असलेल्या एका पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली.

कॅपीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली. 'मी नेहमी हाच विचार करायचो की मी चांगला माणूस आहे. परंतु मी एक चांगला माणूस बनू शकलो नाही. संपूर्ण आयुष्यभर मी वाईट माणूसच राहीलो. मी अनेक लोकांना धोका दिला. ड्रग्स चोरले. माझ्या शरीरालाही नुकसाक पोहचवलं. मला माझ्या या वागण्याबाबत शरम वाटते आहे आणि याबाबत मी लोकांना नेहमी समजावत आलो आहे' मृत्यूपूर्वी अशाप्रकारची भावनिक पोस्ट लिहत त्याने जगाचा निरोप घेतला.

इसाकने त्याच्या पोस्टमध्ये अमेरिकी राष्ट्रपाती डोनाल्ट ट्रम्प यांचीही माफी मागितली आहे. ट्रम्प, जीसस क्राइस्टसह ज्यांची मनं दुखावली आहेत त्या सगळ्यांची माफी त्याने शेवटच्या पोस्टमधून माफी मागितली आहे.

इसाक कॅपीने अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. २०११ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'थोर'मध्ये त्याने भूमिका साकारली होती. त्याशिवाय २००९ मध्ये आलेल्या 'टर्मिनेटर साल्वेशन' आणि 'फॅनबॉइज'मध्येही त्याने काम केलं आहे. इसाकच्या या भावनिक पोस्टने आणि त्याच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

मागे

#MeToo : “क्लीन चीट”च्या बातम्या म्हणजे नाना पाटकरांच्या टीमनं उडवलेल्या अफवा - तनुश्री दत्ता
#MeToo : “क्लीन चीट”च्या बातम्या म्हणजे नाना पाटकरांच्या टीमनं उडवलेल्या अफवा - तनुश्री दत्ता

२०१८ साली बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री तनुश्री दत्ता दीर्घकाळानंतर भारतात....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल
मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल

मुंबईच्या कलिना भागातल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्ष....

Read more