ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘शहीद भाई कोतवाल’चा ट्रेलर प्रदर्शित

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘शहीद भाई कोतवाल’चा ट्रेलर प्रदर्शित

शहर : देश

           इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी यासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. या क्रांतिवीरांमधील एक नाव म्हणजे ‘शहीद भाई कोतवाल’. लवकरच त्यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा भाई कोतवाल यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.


         ‘एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग’ असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या “शहीद भाई कोतवाल” यांच्यावर आधारित चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून भाई कोतवाल यांचं मातृभूमीवर असलेलं प्रेम प्रकर्षाने जाणवत आहे.


        आजपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातील अनेक व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट आले. पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या भाई कोतवाल यांची शौर्यकथा पहिल्यांदाच चित्रपटातून समोर येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच उत्सुकता आहे, त्यात आता या ट्रेलरमुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरला आहे. हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
 

मागे

ट्वीटरवर पायल रोहतगीचा दीपिकावर निशाणा
ट्वीटरवर पायल रोहतगीचा दीपिकावर निशाणा

      नवी दिल्ली - जेएनयूमध्ये  झालेल्या भीषण हल्ल्यातील झालेल्या जखम....

अधिक वाचा

पुढे  

‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल' महाराष्ट्रात टॅक्स फ्री!
‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल' महाराष्ट्रात टॅक्स फ्री!

      पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ ....

Read more