By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 04:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची लव्हस्टोरी जवळपास साऱ्यांनाच माहित आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि पाहता पाहता या मैत्रीचं प्रेमात रुपातंर झालं. २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केलं. आता त्यांना दोन गोंडस मुलंदेखील आहेत.
विशेष म्हणजे त्यांना एकत्र आणणाऱ्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला आज (३ जानेवारी) १७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या चित्रपटातील एक गाणं रितेश-जेनेलियाने रिक्रिएट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधत रितेश-जेनेलियाने लातूरमधील बाभूळगाव येथील एका शेतात बेधुंद होत रोमॅण्टीक अंदाजात डान्स केला.
#RishiandAnjali❤️ #Bestfriends #Lovers #partnerincrime #parents. Sounds pretty much like us @Riteshd... Forever Together- #tujhemerikasam pic.twitter.com/iiM4btXQSx
— Genelia Deshmukh (@geneliad) January 3, 2020
17 years on .... fees like yesterday- reliving the memories of our debut film. #17YearsOfTujheMeriKasam @geneliad pic.twitter.com/VZ6W499tHa
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 3, 2020
या डान्सचा व्हिडीओ रितेशने ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. दरम्यान, ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन के. विजयभास्कर यांनी केलं असून निर्मिती रामोजी राव,ए.व्ही.राव यांची आहे.
मुंबई- 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादाय....
अधिक वाचा