ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या?

शहर : मुंबई

          बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचं निधन झालं आहे. लक्ष्य, अंदाज, सलाम-ए-इश्क सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या कुशल पंजाबीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र स्पॉटबॉय-ईने दिलेल्या वृत्तानुसार कुशल पंजाबीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कुशलचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. कुशल आणि करणवीर अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र होते.


            करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुशल पंजाबीचा फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो पोस्ट करत ‘तुझ्या निधनाची बातमी ऐकताच मला धक्का बसला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला माहित आहे तू जिथे कुठे आहेस तिथे खूश आहेस. तू ज्याप्रकारे तुझे आयुष्य जगत होतास त्याने मला प्रेरणा मिळाली,’ असे करणवीरने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 


        कुशलने चित्रपटांमध्ये देखील सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’, अजय देवगणसोबत ‘काल’ आणि सलमान सोबत ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘दन दना दन गोल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुशलने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. 


              त्यानंतर त्याने ‘लव मैरिज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ‘ईश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. कुलशने यूरोपियन मुलीशी लग्न केले होते. २०१६ मध्ये त्याला एक मुलगा झाला. कुशलने त्याच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.
 

मागे

नात्यांचे पदर दाखवणारी ‘दाह’ कथा, लवकरच मोठ्या पडद्यावर
नात्यांचे पदर दाखवणारी ‘दाह’ कथा, लवकरच मोठ्या पडद्यावर

         प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असतं आणि नात्यां....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेता सलमान खानचा आज ५४ वा वाढदिवस  
अभिनेता सलमान खानचा आज ५४ वा वाढदिवस  

        आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे लाखो चाहत....

Read more