ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

शहर : मुंबई

टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीश यांची मुलगी बुधवारी 8 मे रोजी रात्री राजकोटमधील आपल्या घरी प्लास्टिकच्या खेळण्यांसोबत खेळत होती. यावेळी खेळता-खेळता मुलीने खेळणं आपल्या तोंडात घेतलं आणि चुकून गिळलं. खेळणं गिळल्याने ते घशात अडकलं होतं.
खेळणं घशात अडकल्याने मुलीला श्वास घेताना त्रास होत होता. अखेर गुदमरल्याने मुलीचा मृत्यू झाला. मुलीला वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. मुलीच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले, पण यश आलं नाही. गुरुवारी प्रतीश यांना शुटिंगसाठी सेटवर पोहोचायचं होतं, पण आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच सर्व कामं सोडून ते घरी पोहोचले. प्रतीश आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन राजकोटला रवाना झाले होते. तिथेच मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतीश यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तारक मेहता का उलचा चश्मा, क्राइम पेट्रोल आणि प्यार के पापडसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

मागे

तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करणार महानायक
तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करणार महानायक

तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन ....

अधिक वाचा

पुढे  

बॉलिवूडचा दबंग सलमान लवकरच ’बाबा’ होणार!
बॉलिवूडचा दबंग सलमान लवकरच ’बाबा’ होणार!

बॉलिवूडचा दबंग सलमान खान लाखो चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. सरोगसीच्या म....

Read more