By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ट्विंकलने आजवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. 'मिसेस फनीबोन्स', 'पजामास आर फरगिव्हिंग' आणि 'द लेजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' अशी तिच्या पुस्तकांची नावं आहेत. अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. त्यांना 21 वर्षांचा मुलगा आरव आणि 11 वर्षांची मुलगी नितारा आहे.
अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम केला. त्यानंतर ती लेखनाकडे वळली. ट्विंकल तिच्या लेखनातील उपरोधिक शैलीसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरही अनेकदा ती तिच्या पोस्टमुळे चर्चेत येते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ट्विंकलने आपलं अधुरं स्वप्न पूर्ण केलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी तिने ग्रॅज्युएशनची पदवी संपादित केली आहे. अक्षय कुमारने पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याने ट्विंकलचं तोंडभरून कौतुक केलं. या फोटोमध्ये ट्विंकलच्या डोक्यावर ग्रॅज्युएशन कॅप पहायला मिळतेय.

अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकलनेही कमेंट केली आहे. ‘मी खूप नशीबवान आहे की मला असा जोडीदार भेटला जो मला उंच उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करतो. पण मी पडले तरी तो मला उचलण्यासाठी नेहमीच तयार असतो आणि मी बऱ्याच वेळा पडते, नाही का? उद्या 23 वर्षे पूर्ण होणार आहेत’, असं तिने म्हटलंय.
ट्विंकलनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘..अन् हा आहे माझा ग्रॅज्युएशन दिवस. गोल्डस्मिथ्समध्ये माझा पहिला दिवस जणू मला कालच्याच किंवा बऱ्याच वर्षांपूर्वीचा दिवस असल्यासारखं वाटतंय. ऊबदार ऊन, सुंदर साडी आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या कुटुंबीयांनी या दिवसाला आणखी खास बनवलं आहे. ज्याची मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. आयुष्यात एक असा टप्पा येतो जेव्हा प्रगती करण्याचा सर्वांत सोपा मार्ग हा सरळ असल्यासारखा वाटतो. पण आपण स्वत:ला आणखी पुढे ढकललं पाहिजे, कारण प्रगती करण्याचे असंख्य दुसरे मार्ग आहेत’, असं तिने लिहिलं आहे.
2022 मध्ये ट्विंकलने गोल्डस्मिथ्स या लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये फिक्शन राइटिंगमध्ये मास्टर्ससाठी अर्ज केला होता. त्यावेळी अक्षयने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “लोक त्यांच्या मुलांना शाळा-कॉलेजमध्ये सोडायला जातात. पण मी माझ्या पत्नीला लंडनच्या युनिव्हर्सिटीला सोडायला जातोय. कारण तिला पदवी संपादित करायची आहे.”
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्....
अधिक वाचा