By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 06:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभिनेता अक्षय कुमारने मुलाखत घेतली. या मुलाखतीत नेहमीप्रमाणे राजकीय प्रश्न नव्हते, तर मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले. त्यांचा हा व्हिडिओ सर्वच स्तरात व्हायरल झालेला पहायला मिळाला आहे. अनेकांनी तर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना भाजपाचा प्रचार करत असल्याची टीका देखील केली आहे. त्यावर ट्विंकलने ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केलीय. कोणाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणं याचा अर्थ मी स्वतःचा प्रचार करतेय असा होत नाही. तर,या क्षणी तरी मी केवळ जो पक्ष व्होडकाची पार्टी देईन आणि त्यामुळे मी दुसऱ्या दिवसापर्यंत हँगओव्हरमध्ये राहीन अशा पक्षासोबतच आहे. असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमधे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. गेल्....
अधिक वाचा