ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग 'हे' नियम वाचाच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग 'हे' नियम वाचाच

शहर : देश

केंद्र सरकारने Unlock 5 अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनामुळे सरकारने साहजिकच यासाठी काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत याबद्दलची माहिती दिली. त्यानुसार आता चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. (SOPs for cinema halls )

काय आहे केंद्र सरकारची नियमावली?

* चित्रपटगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच जागांवर प्रेक्षकांना मुभा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे उर्वरित जागा रिक्त ठेवाव्या लागणार.

* प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या बाजूला बसता येणार नाही. प्रत्येक प्रेक्षकामध्ये एका आसनाचे अंतर राखणे अनिवार्य

* रिकाम्या आसनांवर ‘Not to be occupied’ स्टिकर लावणे बंधनकारक.

* चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल.

* चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य असेल.

* चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅप वापरण्याचा सल्ला द्यावा.

* चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.

मात्र, कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीवर ओढावलेली अवकळा पाहता देशभरातील चित्रपटगृहांचा व्यवसाय पूर्वीच्या जोमानेच चालणार का, याबाबत शंका आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने बॉलिवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मर्यादित प्रेक्षकसंख्येचा विचार करता संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक सध्याच्या घडीला आपले चित्रपट प्रदर्शित करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, मर्यादित प्रेक्षकसंख्येमुळे मल्टिप्लेक्सेसकडून तिकिटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर प्रेक्षक या सगळ्याला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, यावरच पुढील समीकरणे अवलंबून असतील.

 

मागे

कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी
कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राज्याच....

अधिक वाचा

पुढे  

'...त्यावेळी मी खूप रडायचो', आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण
'...त्यावेळी मी खूप रडायचो', आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल स....

Read more