ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेता सुबोध भावेला भीती नेमकी कसली आहे? वाचा...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेता सुबोध भावेला भीती नेमकी कसली आहे? वाचा...

शहर : मुंबई

          भय बर्‍याच वेळा प्रसंगानुरूप असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. अभिनेता सुबोध भावेला सध्या कोणत्या तरी भयाची चाहूल लागली असून या अनामिक भीतीमुळे तो भयभीत झाला आहे. परंतु ही भीती नेमकी कसली आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर आगामी २८ फेब्रुवारीला ते बघायला मिळणार आहे ‘भयभीत’ या सुबोधच्या नव्या चित्रापातून. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला या महिन्याच्या अखेरीला येत आहे. 


          नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या या पोस्टरवर सुबोध भावेचा भयभीत झालेला चेहरा प्रेक्षकांना पहायला मिळतोय. अभय सिन्हा, ‘ऍक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा, दीपक नारायणी यांची आहे. सुबोध भावे यांच्यासोबत पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदि कलावंत असणार आहेत.


           अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. ऍक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत.


          २०२० या नवीन वर्षाची सुरुवात बर्याकच नवीन चित्रपटांनी होणार आहे परंतु सुबोध भावे याचा ‘भयभीत’ चित्रपट हा प्रेक्षकांसाठी खास ठरेल अशी आशा आहे. आजवर भयपट साकारण्याची संधी क्वचित मिळाल्याने ‘भयभीत’ साठी सुबोध खूपच उत्सुक आहे. आणि अर्थातच प्रेक्षकांना ही दुप्पट पटीने उत्सुकता लागलेली आहे. 
 

मागे

सपना चौधरींच्या गाडीला अपघात
सपना चौधरींच्या गाडीला अपघात

          नवी दिल्ली - हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी....

अधिक वाचा

पुढे  

‘द बिग बुल’ अभिषेक बच्चन ? आगामी चित्रपटाचे पोस्टर आऊट...
‘द बिग बुल’ अभिषेक बच्चन ? आगामी चित्रपटाचे पोस्टर आऊट...

         अभिनेता अभिषेक बच्चन सध्या बर्‍याच काळापासून मोठ्या पडद्....

Read more