By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 08:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेला डिवचणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाईच्या डोक्यावर अपघात झाला की काय?, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून कंगनावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे. बाईंच्या डोक्यारवर अपघात झाला आहे का हो भाऊ?, असं ट्विट उर्मिला यांनी केलं आहे. तसेच माझ्या प्रिय मुंबईच्या पाठी उभं राहण्यासाठी हे ट्विट असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. उर्मिला यांनी या आधीही कंगनावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे पुन्हा उर्मिला आणि कंगनामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक धुरळा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“for standing up for my beloved city Mumbai “
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियोनीने सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या चाहत्यांसह ....
अधिक वाचा