By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 02:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. सिकंदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ते ग्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने 24 सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 24 तासांच्या आतच त्यांचं निधन झालं.वेणू माधव यांच्या अकस्मात निधनाने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
आंध्र प्रदेशमधील नलगोंडा जिल्ह्यातील कोदाद येथे त्यांचा जन्म झाला. वेणू माधव यांनी मिमिक्री कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर चित्रपटात कॉमेडियन म्हणून पदार्पण केलं. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संप्रदायम’ या तेलुगू चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. वेणू माधव यांनी जवळपास 200 तेलुगू व तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी राजकारणात स्वता:ला सक्रिय केले होते. ‘तेलुगू देसम पार्टी’साठी त्यांनी प्रचार केला होता.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादा....
अधिक वाचा