ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं 84 व्या वर्षी निधन

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 08:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं 84 व्या वर्षी निधन

शहर : कोल्हापूर

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशालता वाबगावकर यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी सरोज सुखटणकर यांचे निधन झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

सरोज सुखटणकर यांनी मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका पार पाडल्या. सध्या सुरू असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. नाटक, मालिका आणि विविध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

सुखटकणर यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीलान्यू भारत नाट्य क्लब मधून सुरुवात झाली होती. तुझं आहे तुझपाशी, प्रेमा तुझा रंग कसा, मुंबईंची माणसं, दिवा जळू दे सारी रात यासह इतर नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला.

अलका कुबल यांच्यासोबत केलेला धनगरवाडा हा सरोज सुखटणकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांनी जोतिबाचा नवस, दे दणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे यासह 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

2017-18 मध्ये सरोज सुखटणकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य सचालनालयाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून सुखटणकर यांना 2006 मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाबद्दल सुखटणकर यांना इतर संस्थांनी देखील पुरस्कार देऊन गौरवले होते.

मागे

जया सहाची एनसीबीकडून चौकशी; अभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची कबुली
जया सहाची एनसीबीकडून चौकशी; अभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची कबुली

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्स प्रकरणाच्या तपासात आता नवीन उलगडे ....

अधिक वाचा

पुढे  

पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला
पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला

भिवंडी शहरात सोमवारी (21 सप्टेंबर) तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली ह....

Read more