By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतीय संगीत विश्वात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र एस.पी. चरण यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
SP Balasubrahmanyam passed away at 1:04 pm today, announces his son SP Charan. pic.twitter.com/o7y8X2d6Kz
— ANI (@ANI) September 25, 2020
चेन्नईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती सुधारली होती. पण, अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आणि अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
जवळपास ४० हजारहून अधिक गीतं गाणाऱ्या एसपीबी यांनी संगीत विश्वात एक मैलाचा दगड प्रस्थापित केला होता. नव्वदचं दशक त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावावर केलं होतं. जवळपास १६ भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. कमल हसन आणि सलमान खान या अभिनेत्यांसाठी त्यांचा आवाज प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला.
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाव आलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Sin....
अधिक वाचा