By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 03:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलीवुड मध्ये अभिनय आणि सौदर्याच्या बळावर एक काळ गाजविणार्या जेष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांच आज निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवेण्यात आले होते. परंतु प्रकृती खालावली आणि अखेर त्यांची प्राण ज्योत मालवली.
'थंडे थंडे पानी से, नाहाना चाहीये' या संजीव कुमार बरोबरच्या गाण्यामुळे विद्या सिन्हा चर्चेत आल्या होत्या. अमोल पालेकर यांच्या सोबतचा त्यांचा 'छोटी सी बात' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा ठरला. त्याशिवाय रजनीगंधा, तुम्हारे लीये, पती पत्नी और वो, सफेद झुठ, मुक्ति यासारख्या चित्रपटातूनही विद्या सिन्हा झळकल्या होत्या.
विद्या सिन्हा यांनी अभिनीत केलेले चित्रपट
1. मीरा
2. तुम्हारे लिये
3. कैदी
4. मुक्ति
5. जीवन मुक्त
6. छोटी सी बात
7. पती पत्नी और वो
8. रजनीगंधा
9. सफेद झुठ
दिल्लीतील शास्त्री भवनात आज 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आ....
अधिक वाचा