By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी चित्रपट आणि हिन्दी चित्रपटातही आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे आणि शोले चित्रपटातील कालीया हया छोट्याशा भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धपकाळणे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सोमवारी त्यांचे सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अभिनेते विजय खोटे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमा सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. भारतीय सिने इतिहासात विशेष नोंद केल्या गेलेल्या शोले सिनेमातील कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. शोलेतील, ‘कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं’ हा संवाद अंत्यंत गाजला.
खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मराठीतील ‘या मालक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या. अभिनय कौशल्य आणि अप्रतिम संवादफेक लाभलेल्या खोटे यांनी साकारलेल्या भूमिका दर्शकांच्या मनात कायम राहिल्या. विजू खोटे यांनी आपल्या कारकीर्दीला नायकाच्या भूमिकेपासून प्रारंभ केला. पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या.
प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निध....
अधिक वाचा