By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 04:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड दबंग खान सलमान सध्या त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमानने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत 'दबंग ३'बाबत मोठा खुलासा केला आहे. 'दबंग' आणि 'दबंग २'मध्ये सलमानच्या वडिलांची 'प्रजापति पांडे' यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कलाकार विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यामुळे आता 'प्रजापति पांडे' यांची भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वत्र चर्चा होती. अखेर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सलमानने एक व्हिडिओ शेअर करत 'प्रजापति पांडे' ही व्यक्तिरेखा प्रमोद खन्ना साकारणार असल्याचं सांगितलं आहे.
'दबंग ३'साठी जवळपास आधीचीच स्टार कास्ट आहे. सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि इतर टीम आहे. परंतु वडिलांची भूमिका साकारलेल्या विनोद खन्ना यांची भूमिका, ओळख कायम ठेवण्यासाठी प्रमोद खन्ना यांची निवड करण्यात आली आहे.सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवात विनोद खन्ना यांच्या फोटोने सुरु होते. त्यानंतर सोनाक्षी, प्रभुदेवा, सलमान आणि विनोद खन्नाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
चुलबुल पांडेचे सावत्र वडिल, प्रजापति पांडे यांची भूमिका साकारणाऱ्या विनोद खन्ना यांच्या जागी प्रमोद खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. प्रमोद खन्ना हे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचे भाऊ आहेत.
'दबंग' आणि 'दबंग २'मध्ये 'प्रजापति पांडे' साकारणारे विनोद खन्ना यांचे २७ एप्रिल २०१७ मध्ये निधन झाले. 'दबंग ३' २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'दबंग ३'नंतर सलमान पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर आलिया भट्टसह संजय लीला भंन्साळी यांच्या 'इंशाल्लाह' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स'चा जज म्हणून दिसलेला पार्शवगायक जावेद अली या....
अधिक वाचा