By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स'चा जज म्हणून दिसलेला पार्शवगायक जावेद अली याचा आवाज आता एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. 'व्हॉटसअप लव्ह' या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना जावेद अली मराठीत गाताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी, 'मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई माझी कर्मभूमी आहे. मी जरी दिल्लीचा असलो तरी माझ्यासकट बहुतांश कलाकारांना मोठं करण्याचं काम महाराष्ट्राने केले आहे. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा मराठी गाणं गाण्यासाठी बोलावलं जातं तेव्हा मी खूश असतो. पण, तिथे जाण्यापूर्वी मी गीताचे संपूर्ण बोल शुद्ध उच्चारण कसे होतील, हया कडे लक्ष देतो आणि त्यासाठी मराठी गाणी आवर्जून ऐकतो. जेव्हा मी ते गाणं रेकॉर्डींगनंतर ऐकतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो की मीपण मराठी गाणं गायलंय!' असं जावेद अली यांनी म्हटलंय. जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकून मी मोठा झालो. मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेचा माझ्यावर प्रभाव आहे. ‘दयाघना...’, व ‘मेंदीच्या पानावर’ ही माझी आवडती मराठी गाणी आहेत. 'व्हॉटसअप लव्ह' या चित्रपटात मी ‘शोना रे’ हे सोलो साँग आणि ‘जवळ येना जरा’ हे श्रेया घोषाल सोबत ड्युएट गायलंय. आणि ह्या चित्रपटात आशाताईंनीही एक गाणं गायलंय. त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे की ‘व्हॉट्सॲप लव’बद्दल आणि हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतला आजवरचा म्युजिकल हीट ठरेल' असंही जावेद अली यांनी म्हटलंय.
'व्हॉटसअप लव्ह' या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंत कुमार महाले यांनी हाताळलीय. तर संगीतकार नितीन शंकर यांनी ह्या चित्रपटाला संगीत दिले असून अजीता काळे यांनी गीतरचना केली आहे. राकेश बापट, अनुजा साठे, पर्शियन अभिनेत्री सारेह फर, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी, अनुराधा राजाध्यक्ष हे कलाकारांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनायाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अमरीश पुरी यांची ....
अधिक वाचा