By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आता मराठी प्रेक्षकांच्या भेटीला ६६ सदाशिव नावाचा सिनेमा लवकरचं भेटीला येणार आहे. तर, या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने योगेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. तर, याशिवाय पु.लं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमासह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची आवाड सुध्दा त्यांनी जपली आहे. अवंतिका, पिंपळपान, रेशीमगाठी आणि ग्रहण या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
गेल्या ब-याच दिवसांपासून 66 सदाशिव सिनेमाची सा-यांनाच उत्सुकता लागली आहे. अखेर त्याचे पहिले पोस्टर समोर आले आहे. माञ, सिनेमात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तर पहिल्या कलाकाराचे नाव उलगडले आसून मोहन जोशी या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून इतर कलाकारांचीही नावे लवकरच समोर येतील. जानेवारी महिन्यातच सिनेमाचे शूटिंग संपले असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आणखीन थोडा काळ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.
अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब करून दाखवले जातात. प....
अधिक वाचा