ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बदलापूरात केमिकल कंपनीत स्फोट : एकाचा मृत्यू तर २ जखमी

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बदलापूरात केमिकल कंपनीत स्फोट : एकाचा मृत्यू तर २ जखमी

शहर : ठाणे

         ठाणे : बदलापूरमध्ये एमआयडीसीत के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान ड्रायरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका कामगारचा मृत्यू तर २ कामगार जखमी झाले आहेत. ड्रायरच्या स्फोटानंतर आजुबाजूचा परिसरात दूरपर्यंत आवाज ऐकू आला. 

       स्फोटामुळे कंपनीला आग लागल्यामुळे कंपनीतले काही सामान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. जखमी झालेल्या कामगारांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पालघर स्फोट

         काही दिवसांपूर्वी असाच एक स्फोट पालघरच्या तारापूर क्षेत्रातील ए.एन.के. फार्मा कंपनीत झाला होता. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू तर ७ जण अत्यंत गंभीर जखमी झाले होते. स्फोट इतका प्रचंड होता की याचा आवाज ५ किमीपर्यंत एकू आला.       

मागे

येवले चहात भेसळ असल्याचे सिद्ध 
येवले चहात भेसळ असल्याचे सिद्ध 

      पुणे – अगदी कमी वेळातच चहाप्रेमींमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवल....

अधिक वाचा

पुढे  

शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत घोळ
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत घोळ

           पुणे - शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रि....

Read more